अमिताभ- रेखा आणि....
अमिताभ- रेखा आणि.... अमिताभचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला अन् पुरे न्यूज चेनल्सपे 'बीग बी' छा गया.योगायोगानं त्याच दिवशी रेखाचा गार्डही पॉझिटीव्ह आल्याने तिचा बंगलाही 'सील' झाला.एका प्रसिध्द वर्तमानपत्रात तर हेडलाईनच होती, "अमिताभ कोरोना पॉझिटीव्ह; रेखाचा बंगला सील" मग काय... सोशल मीडियावर उधाण आलं. पुन्हा एकदा अमिताभ-रेखा संबंध चर्चिले जाऊ लागले. पडदा पडलेल्या भूतकाळातील प्रकरणावरील पडदा हलकेच दूर झाला. हिंदी चित्रपटस्रुष्टीतील महानायक, शहंशाह अमिताभ बच्चन आणि रुपगर्विता, सशक्त अभिनेत्री रेखा यांचे एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान सूर जुळले. ते ८० चं दशक. अमिताभ सुपरस्टार झालेला. एकामागून एक त्याचे चित्रपट हिट होत असलेले. लार्जर दँन लाईफ त्याची प्रतिमा चित्रपटग्रुहाचे पडदे व्यापून उरलेली. एक उंच 'लंबू' हिरो. तो पोलीस ऑफीसर असो, स्मग्लर असो, कुली असो वा सौदागरचा खेड्यातला मोती गुडवाला. प्रत्येक भूमिका त्यानं लिलया पेलली. अनेकानेक भूमिका अजरामर करण्याचे ते मंतरलेले दिवस.आणि रेखाही तिच्या अभिनयामुळे, सौंदर्यामुळे हिट झालेली. अमिताभ-रेखाच्या प्र...